dhamner
इतिहास
धामणेर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव , कृष्णामाईच्या काठावर वसलेलं. निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं. काळ्याशार शेतसरीनं वेढलेलं. त्याचबरोबर एक संपन्न असा आध्यात्मिक वारसा असलेलं. कधीकाळी इथं वैदिकांचं पुण्यक्षेत्र होतं, ज्याला धर्मपुरी या नवानं ओळ्खलं जात असे. तसेच गावाच्या उत्तरेस जवळच असलेल्या निगडी गांवाचे रंगनाथ स्वामी यांनी ज्ञानपीठ चालवलेलं होतं.त्या ठिकाणी श्रावणात मोठी यात्रा भरत असे. धामणेरच्या जवळच कृष्णामाईच्या डोहात राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींनीं आंग्लाई देवी व प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती सापडल्या होत्या. याच मूर्तींची प्रतिष्ठापना स्वामींनी अनुक्रमे सज्जनगड व चाफळ या क्षेत्री विविधत केली , असा इतिहास आहे. म्हणजे साक्षात समर्थांचा पावन पदस्पर्श इथल्या मातीत झालेला होता.
पायाभूत सुविधांचा विकास
इतर सुविधा
हिराजी अप्पाजी धामणेरकर क्रीडांगण
जागृती वाचनालय धामणेर
कै. इंदुमती पवार गुणवत्ता विकास वर्ग
व्यायाम शाळा धामणेर
रमनलाल वाडीलाल शहा बालउद्यान
मारुती उद्यान धामणेर
पुरस्कार
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार
सन २००१-०२
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार
सन २००३-०४
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
जिल्हा स्तरीय प्रथम पुरस्कार
सन २००४-०५
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा
विभाग स्तरावर व्दितीय पुरस्कार
सन २००४ -०५
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
राज्य स्तरीय प्रथम पुरस्कार
सन २००४ -०५
मा.राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हस्ते
निर्मल ग्राम पुरस्कार
सन २४ फेब्रुवारी २००५
पंचायत राज कमिटीची गावास भेट व कामगिरीबद्दल विशेष प्रशस्तीपत्र
सन २००१-०२
जिल्हा स्तरीय अस्पृश्यता निर्मलनाबाबत प्रथम पुरस्कार
सन २००२
यशवंत ग्रामपंचायतराज अभियान
विभाग स्तर प्रथम पुरस्कार
सन २००४-०५
विभागीय स्तरावरील वसंतराव नाईक पाणी व्यवस्थापन कामाचा प्रथम पुरस्कार
सन २००३-०४
शाहू, फुले , आंबेडकर दलित वस्ती सुधार अभियानात जिल्हास्तरीय व्दितीय पुरस्कार
सन २००६ -०७
राज्य स्तरीय प्रथम क्रमांकाचा 'वनश्री ' पुरस्कार
सन २००६ -०७